🕒 1 min read
मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे.
अशा स्थितीत मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांबाबत चिंता निर्माण झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता राज्य सरकारने शनिवार व रविवार लॉकडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गांगुली यांनी एका वृत्तसंसथेला माहिती दिली, ‘आम्हाला लॉकडाउनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही कारण आम्ही सामना आयोजित करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली आहे.
IPL 2021: BCCI President Ganguly says league going ahead as per schedule
Read @ANI Story | https://t.co/KbkLyWmwZk pic.twitter.com/KtJZoSIVkZ
— ANI Digital (@ani_digital) April 4, 2021
मुंबईच्या वाखेडे स्टेडियमवर आयपीएलचे 10 सामने खेळले जात आहेत आणि हे सर्व सामने 10 ते 25 एप्रिल दरम्यान बायो बबलच्या आत खेळले जातील. असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘काही घटनांचा आमच्या हातात जर तपास असता तर या घटनांमागे कोण आहे हे हुडकून काढले असते’
- राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट ; अक्षय पाठोपाठ 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण
- ‘भगीरथच’ पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी भारतनानांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार – जयंत पाटील
- धक्कादायक! बीड जिल्ह्यात रुग्णालय कर्मचारी-नातेवाईकांत हाणामारी
- ‘राज्यातली कोरोनाची स्थिती भयावह,वीज तोडणी थांबवा आणि गरीब,मध्यम वर्गाला मदत करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
