Share

म्युकरमायकोसिसचा उस्मानाबादेत पहिला बळी

Published On: 

उस्मानाबाद: कोरोना सोबतच आता म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार देखील मोठ्या प्रमाणात पसरत आहे. नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येतो. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होतात व या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. राज्यात अनेक ठिकाणी या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच अनेकांचा जीव देखील या आजाराने गेला आहे. उस्मानाबादेत देखील या आजाराने एक बळी गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिसमुळे सोलापूर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसमुळे हा जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील मुळचे रहिवाशी असलेले जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात काम करणारे अर्जुन उत्तरेश्वर लाकाळ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनातून बरे होत असतानाच त्यांच्या डोळ्याला म्युकरमायकोसिसची लागण झाली. सोलापूर येथे उपचार सुरू असताना शस्त्रक्रिया करून एक निकामी झालेला डोळा काढावा लागला. त्यातच त्यांची प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला.

म्यूकरमायकोसिस हा बुरशीमुळे होणारा आजार असून, बुरशी हवेतून पसरते. त्याचा संसर्ग झाल्यास नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. तेव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास हा बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लागण होते. अशा व्यक्तींत नाकातून रक्त येणे, चेहरा एका बाजूने दुखणे, मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, डोळ्यांना त्रास होणे, एकच दृश्य दोनदा दिसणे आदी प्रकारची लक्षणे आढळून येतात. कोव्हिडच्या आजारातून बरे झालेल्यांपैकी काहींना ही लक्षणे दिसल्याने उपचार करावे लागल्याचे डॉक्टरांनी मुंबई, दिल्ली आदी ठिकाणच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. बुरशीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!