Share

स्वातंत्र्य दिवस: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘कोरोना लस’बाबत केली मोठी घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : आज १५ ऑगस्ट २०२०, देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. तर, यंदा कोरोनाचा सावटामुळे सर्वत्र हा दिवस साधेपणाने साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरील सोहळ्याची देखील खास खबरदारी घेतली गेली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास गार्ड ऑफ हॉनर दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यानंतर, परंपरेनुसार पंतप्रधान सबंध देशाला संबोधित करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ७ व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले, यानंतर ते देशाला भाषणातून अनेक महत्वाच्या दिशा व जगासमोर भारताची भूमिका स्पष्ट करत आहेत. तर, सुरुवातीलाच त्यांनी कोरोनाच्या संकटाला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एखाद्या योद्धयाप्रमाणे सामोरे जाणाऱ्या डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, रुग्णालय कर्मचारी यांच्या कामाचा उल्लेख केला. तर या योद्धयाना त्यांनी नमन देखील केले. तसेच या युद्धात देखील भारत विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला.

स्वातंत्र्य दिवस: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण, ‘व्होकल फॉर लोकल’चा दिला नारा

तर, देशातील सर्व जनतेसह जगाचे कोरोना रोगावरील लसीवर लक्ष लागले आहे. यावेळी त्यांनी या लसी विषयी खूप मोठी घोषणा केली असून भारत यशप्राप्तीच्या उंबरठ्यावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेले अनेक महिने एखाद्या ऋषीमुनींप्रमाणेच सर्व वैज्ञानिक हे या लसीवर अनेक प्रयोग व अभ्यास करत असून ते लवकरच आपल्या अभ्यासातून देशाला लस उपलब्ध करून देतील असा विश्वास व्यक्त करत असतानाच, एकूण ३ लसींचे वेगवेगळ्या स्थरांवर चाचण्या सुरु असून सर्व वैज्ञानिकांनी या लसींना प्रमाणीकृत केल्यानंतर मुबलक लसी देशासाठी उपलब्ध करून गरीबांपासून सर्वच बाधितांना याचा लाभ मिळून कोरोनावर मात करता यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

पोळा, मारबत सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास नागपुरात प्रतिबंध

दरम्यान, आपला देश आता ७५ व्या वर्षात पदार्पण करत असताना आता तरी आत्मनिर्भर होणे गरजेचं असल्याचं देखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे. यावेळीचा स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी साधेपणाने साजरा होत असला तरी खास देखील आहे. कोरोनामुक्त झालेल्या तब्बल १५०० योद्धयांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यापैकी ५०० स्थानिक पोलीस आहेत, तर १,००० देशाच्या विविध भागातील कोरोनामुक्त व्यक्तींचा यात समावेश आहेत.

‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबरोबरच विसर्जन देखील घरगुती स्वरुपात करायला हवे’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!