Share

कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण

Published On: 

मुंबई : काल(२८ नोव्हें.)विधिमंडळ जे कायदे पारित करते त्याच्या परिणामांचा अभ्यास किंवा मूल्यमापन केले जात नाही. तसेच कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या उदभवतात असे वक्तव्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण(N.V.Ramana) यांनी केले आहे.

या संदर्भात बोलत असतांना सरन्यायाधीशांनी परक्राम्य अधिनियमाच्या (निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट) कलम १३८ चे उदाहरण दिले व यामुळे दंडाधिकारी न्यायालयांवर भार वाढत असल्याचे सांगितले. विद्यमान न्यायालयांचे ‘व्यावसायिक न्यायालये’ असे नामकरण (री-ब्रँडिंग) केल्याने खटले प्रलंबित राहण्याची समस्या सुटणार नसल्याचेही ते म्हणाले. तसेच दुसरा एक मुद्दा म्हणजे, विधिमंडळ जे कायदे पारित करते त्याच्या परिणामांचा अभ्यास किंवा मूल्यमापन करत नाही. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्टचे कलम १३८ लागू करणे हे याचे उदाहरण आहे. अगोदरच कामाचा प्रचंड ताण असलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांवर हजारो खटल्यांचा बोजा वाढला आहे. त्याचप्रमाणे, विशेष पायाभूत सोयी निर्माण केल्याशिवाय विद्यमान न्यायालयांचे ‘व्यावसायिक न्यायालये’ असे नामकरण केल्याने खटले प्रलंबित राहण्याची समस्या सुटणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, खटले प्रलंबित राहण्याचा मुद्दा बहुआयामी असल्याचे सांगतानाच, गेल्या दोन दिवसांत मिळालेल्या सूचनांवर विचार करून सरकारने हा मुद्दा निकाली काढावा, असे आवाहनही यावेळी रमण यांनी केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!