🕒 1 min read
औरंगाबाद : पैठण येथील श्री संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वकष विकास करतांना या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी या करीता या उद्यान परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यादृष्टीने सर्व समावेशक आराखडा, संकल्पना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. मात्र या सोबतच या उद्यानात सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात यावा अशी मागणी विधिज्ञ सुभाष खडसन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, श्री संत ज्ञानेश्वर उद्यानाची दुरावस्था झाल्याने त्याचे नूतनीकरण करून हे उद्यान विकसित करतांना जनतेच्या आशा-अपेक्षा जाणून घेण्याच्या सुचना ही देण्यात आलेल्या आहेत. त्या शिवाय स्पर्धात्मक पद्धतीने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जनतेकडून उद्यान विकासाचे आराखडे मागविण्यात आलेले आहेत. तरी पैठण येथील नाथ सागर जलाशयाच्या पायथ्याशी असलेले श्री.संत ज्ञानेश्वर उद्यान नेहमी पैठण येथील स्थानिक नागरिकांसाठी तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले असून नाथ सागरामुळे पर्यटनाच्या नकाशावर अालेले पैठण मधील या उद्यानामध्ये देशातुन नव्हे तर विदेशातून देखील अनेक पर्यटक येत असतात.
देशाप्रती असलेल्या राष्ट्रीय एकात्मतेची जन-भावना विचारात घेऊन पैठण शहरामधील श्री.संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये जागा नियोजित करून जगातील सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज उभारण्यात यावा. जेणेकरून पैठण येथील नागरिकांना तसेच देश-विदेशातून येणार्या पर्यटकांना देखील एक प्रकारे प्रेरणा मिळेल व पैठण भूमिपुत्रांनसाठी देखील हि बाब निश्चितच अभिमानास्पद असेल. यासाठी पैठण शहरामध्ये लवकरात लवकर जागा नियोजित करून जगातील सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज उभारण्यात यावा अशी मागणी प्रसिद्ध विधिज्ञ सुभाष खडसन यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- १ ऑक्टोबरपासून बँकेतील नियमासह ‘या’ पद्धतीत होणार बदल
- पायातून रक्त वाहत असतानाही सीएसकेचा ‘हा’ खेळाडू मैदानावरून हटला नाही; फोटो व्हायरल
- ‘हे आंदोलन राजकीय नाही’; आंदोलनात घुसणाऱ्या कॉंग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता
- ‘ऊसतोड कामगार हा राजकारणाचा विषय नव्हेच, श्रेयासाठी मी काम केले नाही!’, पंकजांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
