Share

आरोग्य मंत्र्यांकडे २२ कोटींच्या निधीची मागणी, मनपाच्या आरोग्य सुविधा होणार अत्याधुनिक!

Published On: 

औरंगाबाद : मेल्ट्रॉन रुग्णालयाच्या विकासासाठी २२ कोटी तसेच इतर ९ रुग्णालयाचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मनपाने निधीची मागणी केली आहे. महानगरपालिकेचे – यांनी दिली. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल येथे झालेल्या बैठकीत आरोग्य संदर्भातील प्रलंबित विषयावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला सिव्हिल सर्जन मुरंबीकर, डीएचओ शेळके व महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा हे उपस्थित होते. यावेळी डॉ. मंडलेचा यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका आरोग्य केंद्राच्या तसेच विभागाच्या विकासासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना महानगरपालिका रुग्णालयाच्या अत्याधुनिकीकरण करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.

त्यात मेल्ट्रोन रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची मागणी केली असून जिनो सिक्वेन्सिग लॅब आणि संसर्गजन्य हॉस्पिटल म्हणून विकास करण्यासाठी बावीस कोटी रुपयांची तर महानगरपालिकेच्या नऊ हॉस्पिटलमध्ये डायलेसिस युनिट, सोनोग्राफी सेंटर, नेत्र चिकित्सक सेंटर, २४ तास मॅटर्निटी हॉस्पिटल आदी अद्यावत सेवांसाठी निधीची मागणी केली आहे. तसेच कोविड टेस्टिंग, व्हॅक्सिनेशन वाढवण्यासाठी मनुष्यबळ लागणार असून त्यांच्या पगारासाठी एसडीआरएफ फंडातून निधी देण्याची मागणी मंडलेचा यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!