🕒 1 min read
बीड : बीड मतदार संघातील विविध प्रश्नासाठी अतिरिक्त निधी मिळावा यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पवार यांनी देखिल आ.क्षीरसागर यांच्या मागणीला सकारात्मक आश्वासन दिले.
अजित पवार यांच्या माध्यमातून बीड मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लागत असून बीड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त निधी मिळावा याबाबत निवेदन देत मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले. यावेळी अजित पवार यांनी देखील सकारात्मक आश्वासन देत बीड मतदारसंघासाठी अधिकचा निधी दिल्या जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी आ. क्षीरसागर यांनी मंत्री जयंत पाटील, अशोक चव्हाणांची घेतली भेट घेतली.
खांडे पारगाव टुकुर साठवण तलावाऐवजी चार निम्न पातळी बंधारे मंजुर करून काम तातडीने सुरू करावे या मागणीच्या पाठपुराव्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधारण्यासाठी तसेच पावसामुळे रस्त्याचे झालेले नुकसान याची दुरुस्ती करण्यासाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात-आ.सतिश चव्हाण
- आता महाविद्यालये देखील सुरु होणार; उदय सामंत यांनी दिली माहिती
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- मी नरेंद्रजींना म्हणालो, आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल; फडणवीसांचे मिश्किल विधान
- मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
