मुंबई : ‘आतापर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही. कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे, जर अशी अपेक्षा केली नाहीतर पक्ष कसा पुढे जाईल’ असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
दिलासादायक : राज्यात आतापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्ण बरे होऊन गेले घरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 21 वा वर्धापन दिन आहे. आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करुन प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पक्षाचा 21 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना जयंत पाटलांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांना भाजपा नको असल्याने आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवत उद्धव ठाकरेंच्या नावाला सर्वांनी पसंती दिली. मात्र गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहिल्या तर ठाकरे आपल्या कामाची विशेष छाप पडू शकले नाहीत.
शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात जितेंद्र आव्हाडांपेक्षा जास्त आदर – चंद्रकांत पाटील
यातच कॉंग्रेसमधील काही नेते मंडळी कॉंग्रेस या सर्व घडामोडीत वेगळी कशी आहे हे दाखवत आहे. राहुल गांधी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असणाऱ्या कॉंग्रेसच्याबाबत भाष्य केल्याने मोठा वादंग उठला होता. आता जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची छुपी इच्छा आगामी काळात काय रंग दाखवणार हे लवकरच स्पष्ट होईल.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील ?
‘कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा बोलून दाखवली. एक पक्ष म्हणून अशा अपेक्षा बाळगणे मला काही चुकीचं वाटत नाही’.’प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची तशी भावना असू शकते. प्रत्येक पक्षाची एक अपेक्षा असते, ती कार्यकर्त्यांनी बाळगली नाही तर पक्ष तरी कसा पुढे जाणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
