Share

‘देशासह जगाला कोरोनातून मुक्ती दे’, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे गणरायाला साकडे!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या कष्टाला यश येऊ दे, देशासह जगाला कोरोनातून मुक्ती दे असे म्हणत गणपती बाप्पा मोरया; पुढच्या वर्षी लवकर या ..! या शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गणरायाला भक्तिभावे निरोप दिला. गणेश विसर्जनासाठी सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरातील पर्यटन महामंडळाच्या हॉटेल मागील पाझर तलावात कोरोना नियमांच्या अनुषंगाने व्यवस्था करण्यात आली होती.

शहरातील महादेव मंदिरातील बारव येथील पारंपरिक विसर्जन स्थळाची स्वच्छता व विसर्जनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना नगर परिषदेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गणेश विसर्जन स्थळी भेट देऊनस विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांशी संवाद साधला. कोरोना नियमांच्या अनुषंगाने गणेश भक्तांनी अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गणेश भक्तांचे आभार मानले.

गणेश भक्तांसोबत संवाद साधत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेश उत्सवात कोरोना संकटामुळे प्रत्येकाला दोन हात लांब राहावे लागले. असे स्पष्ट करीत येत्या काळात दोन्ही कोरोना प्रतिबंधक लसीचे १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण झाल्यास आपण येणारा गणेशोत्सव एकत्रपणे व जल्लोषात साजरा करू असा विश्वास व्यक्त करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागरिकांना लस घेण्याचे अवाहन केले. यावेळी गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे आदींसह शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!