Share

मान्सूनच्या परतीला विलंब; पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Published On: 

नवी दिल्ली : देशात मान्सून प्रतीच्या प्रवासाला सुरवात झाली असून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. पुढील चार दिवस असाच तुफान पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या चार दिवसात महाराष्ट्र, गोव्यासह  6 राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सूनच्या परतीला विलंब झाल्याचे सांगितलं जात आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता बंगालच्या उपसागरात पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरनंतर पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  पुढील पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!