🕒 1 min read
मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंगी तिच्या विनोदी अंदाजामुळे लोकप्रिय आहे. तिच्या याचअंदाजामध्ये ती सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतचं तिने तिच्या शैलीमध्ये एक पोस्ट शेअर केली असून ती सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने थेट अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण यांचा उल्लेख केला असल्याचे पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/p/B-J40wQhNlm/?utm_source=ig_web_copy_link
हेमांगीने तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत लिहिलं की, “तिथं दिपविर, विरुषका क्वारंटाईन काळात लय रोमांचिक सेल्फ्या पोष्टीत हायेत, मंग म्हणलं इथं आमी पन काय कमी नाय! इस बंद कमरे में पतीदेव का कॅमेरा….हे ते कमरा… हे आपलं ते कमर दबा रहें हैं हम! तो फिर क्या गम, तो फिर क्या गम!” अशी गंमतीशीर पोस्ट तिनं शेअर केली आहे. सोबतच आपल्या पतीची सेवा करतानाचे काही फोटो देखील तिनं शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांचा प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.
लॉकडाऊनमध्ये सगळेच घरात बंद असल्याने बॉलिवूडचे ट्रेडिंग कपल म्हणून ओळखले जाणारे दीपिका आणि रणवीर, विराट आणि अनुष्का या कपलल्सना लॉकडाऊनमुळे एकमेकांसह वेळ देता येणं शक्य झाले. इतर वेळी ते आपाल्या कामात व्यस्त असल्याने कलाकारांना वेळ देणे जमत नाही त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान हे कपल रोमँटीक टाइम एन्जॉय करताना दिसतात. अस एकंदरीत मत हेमांगीचे असल्याने तिने थेट आम्ही पण काही कमी नाही म्हणत तिच्या पती सोबतच फोटो शेअर केला आहे जो फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
