मुंबई : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंधरा दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू राहील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील.
सिनेमा आणि टीव्ही मालिकांचे शूटिंगही बंद राहणार आहे. महाराष्ट्रात कर्फ्यू लावण्यापूर्वी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. दीपिका आणि रणवीरचे एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार दीपिाका आणि रणवीर बंगळुरुला रवाना झाले आहेत. दीपिकाचे संपूर्ण कुटुंब बंगळुरुला राहते. मुंबईत शूटिंग बंद असल्यामुळे दीपिका आणि रणवीर कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बंगळुरुला गेले असावेत. गेल्या वर्षी देखील लॉकडाऊनमध्ये दीपिका आणि रणवीर महाराष्ट्र बाहेर होते. ते दोघेजण गोआमध्ये लॉकडाऊन सुट्या एन्जॉय करत होते.
महत्वाच्या बातम्या
- तीन दिवस रांगेत थांबूनही रेमडिसिव्हीर मिळेना, पुण्यात रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन
- ‘शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या’
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात कडक निर्बध लागू, विनाकारण फिरण्यास मनाई
- विराटने दिलेल्या ‘त्या’ ऑफरबाबत मॅक्सवेलकडून खुलासा
- नितीन गडकरींनी बेळगावात मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

