🕒 1 min read
श्रीलंका : नवख्या खेळाडूंचा भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आणि शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत टीम श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने दमदार विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.
भारताच्या विजयासाठी 276 धावांचं लक्ष असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला. या विजयात सातव्या क्रमांकावर आलेल्या दीपक चाहरचे मोठे योगदान होते. या विजयात मोठा वाटा वाचलेल्या दीपक चाहरचे सर्वच स्तरातून कौतुक झाले.
????️ ????️: @deepak_chahar9 talks about the impact @msdhoni has had on his on-field mindset. #TeamIndia #SLvIND pic.twitter.com/T5sM5bL1MX
— BCCI (@BCCI) July 22, 2021
दरम्यान, दुसर्या वनडे सामन्यातील आपल्या कामगिरीचे श्रेय दीपक चाहरने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला दिले आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत त्याने धोनीकडून मिळालेल्या शिकवणीचा उलगडा केला. यावेळी दीपक म्हणाला की, धावांचा पाठलाग करण्याची कला त्याने धोनीकडून शिकली आहे. तिसऱ्या वनडे सामन्याच्या पार्श्वभूमीवर दीपकने पत्रकारांशी सवांद साधला त्यावेळी त्याने आपल्या मॅच-विनिंग खेळीचे श्रेय धोनीला दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला दुखापतीने ग्रासले, बीसीसीआय करणार निवड समितीशी चर्चा
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- अखेर रसिका आणि असिफ यांचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पडला पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

