Share

शिवजयंतीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गंगापूर शहरात शिवजयंतीला (दि. १९) शिवतीर्थ येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. याची माहिती नगराध्यक्षा वंदना पाटील, उपनगराध्यक्षा मंगल राजपूत, मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी दिली.

शिवजयंतीला सकाळी ८ वाजता शिवकार्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूंच्या पुतळ्याला दुग्धभिषेक होईल. त्यानंतर दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत शिवकालीन मर्दानी खेळ लाठी/काठी, तलवारबाजी, भाले, इतर मैदानी खेळांची कवायत होणार आहे. तसेच दुपारी साडेतीन वाजता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांच्या वेशभूषेत येणाऱ्या मुलांना उत्कृष्ट वेषभूषेसाठी गौरविण्यात येईल. शिवशाहीर प्रा. प्रवीण जाधव व बालशिवशाहिर स्वानंदी ठाणगे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम दुपारी चार वाजता आहे.

त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शिवतीर्थ येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब, आमदार अंबादास दानवे, किरण डोणगावकर, कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!