Share

कोरोना हरणार… राज्यातील नव्या कोरोना बाधितांमध्ये घट तर कोरोनामुक्तांमध्ये वाढ !

Published On: 

मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रुग्ण संख्येत घट होत असून कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. राज्यात आज ४८ हजार ६२१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ५० ते ६० हजारांवर असलेल्या हा आकडा ५० हजारांच्या आत आला आहे. तर, ५९ हजार ५०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, दिवसभरात ५६७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये नव्या कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे २७ एप्रिल २०२१ पासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरता आहे. यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्तेवरील ताण कमी होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!