Share

सरसकट आर्थिक मदत जाहीर करा, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Published On: 

औरंगाबाद : ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने मराठवाड्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रामध्ये आमदार चव्हाण यांनी म्हटले की, ‘मागील दोन दिवसात मुसळधार पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन, मुग, उडीद, भुईमुग, आदी पिके नामशेष झाली आहेत. तर कपाशी, मका, उस, मोसंबी, बाजरीची पिके आडवी झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मुडघाभर पाणी साचले असून पिके पिवळी पडत आहेत. मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच अर्थचक्र मोडले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्या वर्षी देखील खरीप हंगाम हातातून निसटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.’

सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे २१ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसल्याचेही आमदार चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. पूर्ण पिकच वाहून गेल्याने पंचनामे कशाचे करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे पंचनामे न करता शासनाने त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!