भिगवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिगवन परिसरातील गावांच्या अडचणी व समस्यांचा आढावा घेऊन प्रशासनाच्या सर्व विभागातील अधिकारी वर्गाला त्वरीत उपाययोजनांसाठी दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. तसेच खासदार सुळे आणि भरणे यांच्या प्रयत्नांतून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी नंतर भिगवन शहरामध्ये दुसऱ्या शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ संपन्न झाला.
यावेळी भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता, बेरोजगार, मजूर, निराधार उपाशी झोपणार नाही यासाठी आमच्या मार्गदर्शक आदरणीय खासदार सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, इंदापूर बस स्थानक, इंदापूर बाजार समिती, भिगवन या ठिकाणी एकुण ५०० शिवभोजन थाळी उपलब्ध होणार असल्याचे सांगून शिवभोजन योजना इंदापूर तालुक्यासाठी तातडीने मंजूर केली असून त्यापैकी निमगाव केतकी व भिगवन शहरातील या योजनेचा शुभारंभ झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिगवन परिसरातील गावांच्या विविध अडी अडचणी यावेळी भरणे यांनी जाणून घेतल्या तसेच इंदापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सदर अडी अडचणी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या.
दरमान्य, अवघ्या पाच रुपयांमध्ये उत्तम प्रतिचे १५० थाळी जेवण भिगवन शहरामध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळे माझ्या तालुक्यातील गोरगरीब , निराधार,स्थलांतरीत कोणीही उपाशी झोपणार नाही याची इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने दक्षता घेतली असून शिवभोजन थाळी योजनेसाठी गोरगरिब जनतेचे पाच रूपये भिगवन परिसरातील दानशुर व्यक्तिंनी भरून ही योजना यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी भरणे यांनी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
