मुंबई: एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आज एमपीएससी आयोगाने पुढील वर्षी २०२२ ला होणाऱ्या सर्व अंदाजित परीक्षांचे (MPSC Exam 2022) वेळापत्रक (MPSC Exam 2022 Time Table) जाहीर केल्यामुळे विध्यार्थ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे आता अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक अंदाज लावता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सेवा वर्षभरात वर्ग एक आणि दोन साठींच्या विविध संवर्गांसाठी साधारण १३ प्रकारच्या परीक्षा घेते. याचं अंदाजे वार्षिक वेळापञक upscच्या धर्तीवरच mpscने बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच जाहिर केलंय. परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचं परीक्षार्थींनी स्वागत केलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/TSNOZ64woC
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 4, 2021
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ७, ८ आणि ९ मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा १२ मार्च २०२२ रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा २ जुलै २०२२ रोजी होईल तर निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘विरोधकांचे गळे कसे दाबायचे याचे…’, आशिष शेलारांचे टीकास्त्र
- यूपीए’ नेतृत्वाचा दैवी अधिकार कोणाचा ते येणारा काळ ठरवेल-शिवसेना
- ‘लस नाही तर बस नाही,डोकं आहे पण मेंदू नाही’ संदीप देशपांडेंचा खोचक टोला
- चाळीशीच्या पुढील नागरिकांना बुस्टर डोस द्या; वरिष्ठ शास्त्रज्ञांची केंद्राकडे शिफारस
- काँग्रेसने लोकसभेत शंभरी पार केल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवरील ‘गेम चेंज’ होणार नाही- शिवसेना


