Share

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जिवलग व्यक्तीचे झाले निधन

Published On: 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्री न्यूयॉर्कच्या एका हॉस्पीटलमध्ये निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.रॉबर्टसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे बिझनसमॅन होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्रक जारी करत आपल्या भावाचे निधन झाल्याची माहिती दिली.

‘मी अतिशय जड अंतःकरणाने सांगू इच्छितो की, माझा लहान भाऊ रॉबर्ट याचे शनिवारी रात्री उशिरा दुःखद निधन झाले. तो माझा केवळ लहान भाऊच नव्हता, तर एक चांगला जवळचा मित्र होता. त्याच्या मृत्यूमुळे माझ्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र त्याच्या गोड आठवणी याच मला भावी आयुष्यात वाटचाल करण्यास मदत करतील. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो’, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘तो माझ्यापेक्षा केवळ २ वर्षांनी लहान होता. त्यामुळे आमच्यात भावाच्या नात्यापेक्षा मैत्रीचे जास्त संबंध होते’, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

रॉबर्ट ट्रम्प हे ट्रम्प ऑर्गनायझेशनचे माजी उच्च पदाधिकारी होते. ट्रम्प कुटुंबातील चार भावंडांपैकी ते एक होते. त्यांचे आणखी एक बंधू फ्रेड ट्रम्प यांचे 1981 मध्ये निधन झाले. पुतणी आणि फ्रेड यांची कन्या मेरी ट्रम्प हिच्यासोबत झालेल्या कायदेशीर लढाईमुळे रॉबर्ट ट्रम्प प्रकाशझोतात आले होते.

खुशखबर! पुणेकरांची पीएमपीएमएल बससेवा होणार पूर्ववत; लवकरच सेवेत होणार रुजू

कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे संधी म्हणून बघा- हसन मुश्रीफ

प्रिय फेसबुक… ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी फेसबुकलाच केली ‘हि’ आश्चर्यकारक मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!