औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ना त्या कारणाने सतत चर्चेचा भाग बनलेले असते. यावेळी नवीन सबब समोर आली आहे. यावेळी प्राचार्याच्या अनुपस्थीतीमुळे मराठवाडा विद्यापीठ चर्चेत आले आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे यावेळी उपस्थिती ही ऑनलाईन होती. तरिही एकूण अपेक्षित प्राचार्याच्या संख्येच्या निम्म्या प्राचार्यानी यावेळी दांडी मारली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे विभागातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि महाविद्यालय प्रतिनिधींसाठी बुधवारी विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास केंद्रात ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात विभागातील सर्व प्राचार्य-प्रतिनिधी सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र निम्म्याहून अधिक प्राचार्यांनी कार्यशाळेला दांडी मारली. विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती हा नेहमी विषय नेहमीच विद्यापीठात सुरु असतो. पण कोरोना काळात बहुतेक वर्ग ऑनलाईन झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल. अशी अपेक्षा सर्व व्यक्त करत होते.
पण विद्यापीठाच्या ऑनलाईन कार्यशाळेला प्राचार्यच जेव्हा दांडी मारतात तेव्हा विद्यार्थ्यांकडून कोणती अपेक्षा ठेवायची. बुधवारी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ४१० असताना या कार्यशाळेला केवळ २१० प्राचार्य-प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली. केंद्राचे संचालक डॉ.एन.एन.बंदेला व सहसंचालक डॉ.मोहम्मद अब्दुल राफे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवसभराच्या या कार्यशाळेत उद्घाटक कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी ‘उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण,’ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांचे ‘परीक्षा पद्धतीतील सुधारणा,’ उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. डी. डी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली
- ‘बाहेरचे फक्त बघे, ते सामील नसतात’; परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
- ‘…त्यावेळी मुजोर ब्रिटिश सरकारलाही शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले होते’
- ‘आता पवार म्हणतील, “त्यांनी” विवाहित व्यक्तीशी लग्न केलंय, त्यामुळे चारित्र्याची चौकशी केली पाहिजे’
- ब्रेकिंग न्यूज : करुणा शर्मांच्या तक्रारीवर धनंजय मुंडेंचा खुलासा

