🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मावळत्या सरकारने पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना क्षेत्रवार हेक्टरी अर्थसहाय्य देण्याचे घोषीत केले आहे. पंचनामे झाले म्हणतात, पण पुढे काय? असा सवाल अर्थतज्ञ एच. एम. देसरडा यांनी सिंचन भवनमध्ये आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
देसरडा म्हणाले, राज्याची आर्थिक, सामाजिक, शैक्षणीक स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. १३ कोटी पैकी ११ कोटी लोकांच्या हालअपेष्टा होत आहेत. मावळत्या सरकारने पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याचे घोषीत केले आहे, “पण पुढे काय?” हा प्रश्न आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आहे. त्यामुळे राज्यपालांनी यासाठी समित्या कायम करून कार्यवाही करावी.
सोबतच राज्य स्तरावर देखरेख तसेच तालुका निहाय समित्या आणून नुकसानग्रस्तांना सहाय्य तसेच रोजगार हमीचे काम, शीधावाटप आदी कामांना अग्रक्रम द्यावा. राज्यात मुख्यमंत्रीपद, सरकारस्थापन करण्याच्या प्रश्नावर जो राजकीय कलगीतूरा सुरू आहे तो अपेक्षीत नाही. निवडणूकपुर्व निकालानंतर जे काही घडले व घडत आहे त्यामुळे काही मुलभूत प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे. प्रचलीत निवडणूक पद्धतचमुळी सदोष आहे.
यात प्रत्यक्ष झालेल्या पडलेल्या मतदानाच्या प्रमाणात विविध पक्षांना जागा मिळत नसल्याचे देसरडा म्हणाले. जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर राजकारणाची फारकत दिसते आहे. गत पाच वर्षात १५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. दोन वर्षाच्या खरीपात व येणाऱ्या रब्बी हंगामात राज्यातील सहा कोटीहून अधिक जनतेवर अभूतपूर्व संकट ओढावले आहे. आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे यासंबधीचे प्रश्न कोण व कसे सोडवणार याविषयी भेटीसाठी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाने राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागितल्याची माहितीही देसरडा यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1195572566670229504?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1195571503728693249?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
