Share

पप्पा तुम्हाला बिग सॅल्युट पण तुमची काळजी घ्या, पोलिसाच्या मुलाचं भावनिक पत्र व्हायरल 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनामुळे देशावर आणि राज्यावर मोठे संकट आले आहे. अशा संकटात प्रशासकीय कर्मचारी, पोलीस यंत्रणा, आणि आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून ही परिस्थिती हाताळत आहेत. यामध्ये पोलीस दल अहोरात्र तैनात केले आहे. नागरिकांनी सरकारने दिलेल्या आदेशांच योग्य पद्धतीने पालन कराव यासाठी पोलीस जनतेला वारंवार सजग करत आहेत. अशा सर्व परीस्थित पोलीस कर्मचारी आपली भूमिका चोख बजावत  असल्याने एका मुलाने आपल्या पोलीस कमर्चारी असलेल्या  वडिलांना पत्र लिहित बिग सॅल्युट दिला आहे.

वाचा काय आहे पत्र ? 

सध्या जगभरात कोरोनाची दहशत आहे. आपल्या देशासह राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, पप्पा हे तुम्हाला तर माहितीच आहे. देशात लॉकडाऊन सुरू आहे. शहरात राहणारे नागरिक आता आपल्या आपल्या खेडेगावात जात आहेत. पण आपलं तस नाही.. तुम्ही एक जबाबदार पोलीस अधिकारी आहात. तुम्हाला सुट्टी नाही, तुमच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत. नागरिकांना घरी बसून राहण्यासाठी सक्ती केली जात आहे, कारण त्यांच्या तब्येतीची काळजी आहे म्हणून….पण या महामारीत पोलीस रस्त्यावर येऊन प्रत्येक नागरिकाला घरात बसायला सांगत आहेत. पण पोलिसांचा विचार कोणी करतंय का? पोलिसांना सर्वच सॅल्युट करतात पण पडद्यामागचे वास्तव कुठे माहिती आहे कुणाला. तुम्ही रोज सकाळपासून रात्री कधीपर्यंत ऑन ड्युटी असाल हे तुम्हीसुद्धा सांगू शकणार नाहीत. सध्या सर्वजण घरी बसून आहेत. अशावेळी तुम्ही आमच्यासाठी ऑन ड्युटी असता. आपण कोरोनापासून सावध रहावं असे प्रत्येकालाच वाटत असतं. पण तुम्ही कशाचीच तमा न बाळगता आमच्यासाठी कोरोनाशी दोन हात करत आहात. कोरोना असो या डोरोना ..आपले पोलीस कुठे कुणाला घाबरतात…

अगदी माझा जन्म झाल्यापासूनच मी पोलिसांना खूप जवळून बघितलं आहे. कायमच जनतेच्या रक्षणासाठी तुम्ही काही काळ दौंड. गडचिरोली. मुंबई, अहमदनगर तसेच राज्यातल्या इतर भागात ड्युटी केली आहे…अजूनही आठवतंय तुम्ही गडचिरोलीला ड्युटीला होते तर त्या जंगलात मोबाईलला रेंज येत नव्हती. तर तुम्ही झाडावर चढून घरी फोन करायचे…त्यानंतर आतादेखील BOMB DETECTION & DISPOSAL Squad (B.D.D.S.) च्या माध्यमातून स्वतःचाच जीव धोक्यात घालून आमच्या सर्वांच्या रक्षणासाठी पप्पा तुम्ही तत्पर असतात…राज्यावर कोणतेही संकट येउद्या तुम्ही म्हणजे आपले पोलीस त्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी कायम तयार असतात…पप्पा आता लॉकडाऊनमध्ये काही अतिउत्साही लोक घराबाहेर पडत आहेत तर त्यांना समज देण्यासाठी पोलिसांना कधीकधी लाठी उचलावी लागते…हे करणे खरच गरजेचे आहे यात काहीच चुकीचे नाही…
मूळ मुद्दा, सर्वजण काळजी घेत असतीलच, पण तुम्हीसुद्धा जनतेची सेवा करता करता तुमची स्वतःची पण काळजी घ्या. बाहेर ड्युटीला असताना मास्क लावा, हँड ग्लोज वापरा, सॅनिटायझर जवळ ठेवा, हात कायम धुवा, तसेच तुम्हाला जेवढी तुमची काळजी घेणं शक्य होईल तेवढं करा ही विनंती आहे पप्पा तुम्हाला… बिग सॅल्युट फॉर महाराष्ट्र पोलीस  त्याबरोबरच डॉक्टर्स, मेडिकलचा सर्व स्टाफ, कोरोनाशी लढणाऱ्या प्रत्येकाला सलाम
तुमचा चिरंजीव.
अक्षय बाळासाहेब पोकळे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!