🕒 1 min read
अलिबाग : महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून, राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असं चित्र पाहायला मिळतं आहे. शिवसेना पक्षामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सतत आरोप, टीकेबाजी करत असतात. अशातच राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.
काय म्हणाले दादा भुसे ?
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना मुलगा मुख्यमंत्री व्हावा म्हणून केली नव्हती, तर सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसावा ही त्यांची इच्छा होती, असं म्हणत दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलं आहे. अलिबाग येथे शिवसेना जिल्हा कार्यकारणीच्या बैठकी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेबांना चौकटीपुरते मर्यादित करू –
बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचे बाप होते. त्यामुळे त्यांना ठाकरे घराण्याच्या चौकटीपुरते मर्यादित करू नका, असा टोलाही दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की,शिवसेना घरात बसून वाढली नाही तर शिवसैनिकांच्या त्याग, कष्ट आणि समर्पणाच्या वर पक्ष संघटना मोठी झाली आहे.
तर ही परिस्थिती आज आली नसती –
तसेच, घरातला विषय घरात मिटावा अशी आमची इच्छा होती. उद्धव ठाकरेंचीही इच्छा व्हायची. पण कोणीतरी येऊन खडा टाकायचे. त्यामुळे विषय टोकाला जायचे. मुख्यमंत्रीपदावर असताना उध्दव ठाकरे किती शिवसैनिकांना भेटत होते. ते आज जे करत आहात ते आधी केले असते तर ही परिस्थिती उद्धवलीच नसती, असंही भुसे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane । किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
- Best Range Electric Cars | भारतात जबरदस्त रेंजसह ५ इलेक्ट्रिक कार उपलब्ध, जाणून घ्या!
- Narayan Rane । उद्धव ठाकरे लबाड लांडगे भरोसा ठेवण्याच्या लायकीचे नाहीत; नारायण राणेंचा टोला
- Health Tips | रात्री गरम दूध पिणे आहे औषधासारखे, जाणून घ्या फायदे
- Narayan Rane । नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंची औकात काढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
