Share

डॉ. आशिष लेले यांनी ‘एनसीएल’च्या संचालक पदाचा स्वीकारला कार्यभार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संचालकपदी महाराष्ट्रीय शास्त्रज्ञाची निवड करण्यात आली आहे. संचालकपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. लेले यांनी प्रभारी संचालक डॉ. श्रीवारी चंद्रशेखर यांच्याकडून गुरुवारी संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यानंतर २६ वर्षांनी एनसीएलचे संचालक म्हणून महाराष्ट्रातील शास्त्रज्ञाची निवड झाली आहे.

डॉ. लेले रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ॲडव्हान्स्ड मटेरियल्स अँड अल्टरनेटिव्ह एनर्जी ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या आधी ‘एनसीएल’चे मुख्य शास्त्रज्ञ म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. विज्ञान जगतात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, इन्फोसिस प्राइझ आदी पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ते फेलो आहेत.
१९९३ मध्ये ‘एनसीएल’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाल्यानंतर. ऱ्हिओलॉजी, कॉम्प्लेक्स फ्लुइड्स, पॉलिमर डायनॅमिक्स आणि पॉलिमर प्रोसेसिंग या विषयांसंबंधीचा संशोधकांचा गट स्थापन करून त्यांनी प्रयोगशाळा आणि उद्योगांच्या समन्वयातून अनेक प्रकल्प साकारले आहेत.

संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यास डॉ. लेले म्हणाले कि, संचालक झाल्याचा आनंद नक्कीच आहे. पण महाराष्ट्रीय किंवा अमहाराष्ट्रीय असा विचार मी करत नाही. प्रत्येक संचालकांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेसाठी मोठे योगदान दिले आहे. माझ्या कार्यकाळात संशोधनाच्या नव्या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा विचार आहे. आंतरविद्याशाखीय संशोधन होणे महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या शाखांत काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणून काही मोठे प्रकल्प राबवायचे आहेत. हरित ऊर्जा, हायड्रोजन अशा काही क्षेत्रांमध्ये काम करून देशाला पुढे नेण्याला प्राधान्य आहे. असे एनसीएल चे संचालक डॉ. आशिष लेले म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!