औरंंगाबाद : सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले. सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे घडली. पोलिसांनी बालविवाह रोखल्यानंतर नातेवाईकांनी घरासमोरील मंडप हटवला.
सिल्लोड तालुक्यात बोरगाव बाजार येथे १४ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती आज सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याचे समजल्यावर शहर सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी याबाबत तातडीने सूत्रे हलवत या विवाहाविषयी खात्री करून घेतली.
मात्र, विवाहस्थळ हे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे निरीक्षक बागवडे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून त्यांना प्रकरणाची माहिती दिली. यावेळी लग्नाची लगबग सुरू असतानाच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बोरगाव बाजार गाठून बालविवाह रोखला. शिवाय वधू-वरांकडील दोन्ही पालकांची आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेऊन उभयंतांचे समुपदेशन केले.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

