Share

‘मुख्यमंत्री महोदय, हे धक्कादायक चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावरुन संताप व्यक्त केला असून हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भातला एक व्हिडिओच स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे.

त्या म्हणाल्या, ‘कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. गृहखाते ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ करणे त्यांना एट्रॉसिटीच्या धमक्या देणे, महिला सरपंचाला मारहाण करणे याचे लायसन्स दिले आहे का? मुख्यमंत्री महोदय हे धक्कादायक, चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे आहे!’

सदरील घटना ही पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या महिला सरपंचाचं नाव गौरी गायकवाड असून मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव सुजित काळभोर असे आहे. या घटनेविरुद्ध गौरी गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरूनच भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर संतप्त स्वरूपातील टीका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!