कराड : दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक होण्याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. या घटनेची तीव्र शब्दात निंदा करत असून, मोदी सरकारने हटवादीपणा सोडून कृषी विधेयक मागे घ्यावीत, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर मार्च काढला आहे. याला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरीही काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रकार घडला आहे.
मोदींच्या हटवादीपणामुळे यातून काहीही तोडगा निघत नाहीये. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना आधी विश्वासात घ्या, मगच कायदे करा असे चव्हाण यांनी म्हटले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील या हिसेंत आतापर्यंत एका शेतकऱ्याचा जीव गेले आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.
महत्वाच्या बातम्य
- ‘दिल्लीत पोलिसांनीच हिंसा केली, ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन !’
- ‘मोदींच्या द्वेषापोटी काँग्रेस शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचार घडवत आहे’
- शेतकरी आंदोलन चिघळले; पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकर्त्यांनी उपसल्या तलवारी!
- ‘मोदी सरकारची दादागिरी, मस्ती खपवून घेणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं’
- दिल्लीतील चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने उचलले महत्वाचे पाऊल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
