Share

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व परिसरातील ५ किलोमीटर अंतरापर्यंत संचारबंदी !

Published On: 

पंढरपूर : राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी  पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, 26 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत होत असतात. या सर्व सोहळ्यांना राज्य शासनाने घातली बंदी, आषाढी यात्रेनंतर कार्तिक वारी ही निर्बंधातच होणार आहे.

येत्या 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूरची कार्तिकी वारी आहे. पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चार वाऱ्यातील ही क्रमांक दोनची वारी आहे. साधारण पाच ते सात लाख वारकरी भाविक या वारीला हजेरी लावतात. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्रित जमले तर कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावू शकतो आणि वारीला येणाऱ्या भाविकांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. ही शक्यता गृहीत धरुन राज्य शासनाने कार्तिकीला येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांना बंदी घातली आहे.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी झालेल्या आषाढीवारीला असे नियम लावण्यात आले होते आणि वारी प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करण्यात आली होती. यावेळी कार्तिकी वारी देखील प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करण्याच्या हालचाली वारकरी संप्रदायात सुरु आहे.

तर दुसरीकडे कार्तिकी यात्रेसाठी पंढपुरात २२ नोव्हेंबर रात्री १२ पासून २६ नोव्हेंबरपर्यंत एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तर २५ नोव्हेंबर रात्री १२ पासून २६ नोव्हेंबर रात्री १२ पर्यंत शहर व परिसरातील ५ किलोमीटर अंतरापर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र वारकरी या निर्णयाला कसे स्वीकारतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!