पंढरपूर : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले होते. त्यामुळे राज्यभर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु सध्या देशभरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु अजूनही धोका पूर्णपणे टळला नसल्यामुळे काही अंशी सरकारला निर्बंध लावावे लागत आहेत.सध्या राज्यभरातील धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. याचाच परिणाम आता महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळ्यावर देखील झाला आहे.
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच आषाढी वारीच्या सोहळ्यादरम्यान 17 ते 25 जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील 9 गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात कडेकोट बंदोबस्त आणि व्यवस्था केल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी पत्रकार परीषेदेमध्ये सांगितले आहे.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘आषाढी वारीच्या निमित्ताने 17 जुलैच्या दुपारी दोन वाजल्यापासून ते 25 जुलैच्या दुपारी चार वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी असेल. यानिमित्ताने पंढरपूर शहर, भटुंबरे, चिंचोळे भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी या गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय चंद्रभागा नदीत स्नान करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
संचारबंदीच्या काळात कोणतीही खाजगी बस किंवा खाजगी वाहने येणार नाहीत यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. पंढरपूर शहरात संचारबंदीच्या काळात अत्याआवश्यक सेवा सुरू असणार आहेत. पंढरपुरीताल स्थानिक नागरिकांच्या प्रवासकरीता दिलेल्या वेळेत मुभा देण्यात आली आहे. पंढरपुरातील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी शहराबाहेरून वेगळे मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला १५ दिवस जेलमध्ये डांबा मात्र माझ्या समाजातील कार्यकर्त्यांना सोडा’
- ‘भास्कर टपोऱ्या सारखा कोणाचीही कळ काढतो म्हणून शिव्या दिल्या असतील, सवय आहे त्याला’
- ‘अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ कोणी केली हे जाणून घेण्यासाठी भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा’
- उत्पादन खर्च शून्य म्हणूनच ‘झिरो बजेट’ शेती आधुनिक तंत्र!
- ‘१२ आमदारांचे निलंबन म्हणजे नियोजन पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम’


