Share

महाराष्ट्रातील दोन दिग्गज मंत्र्यांना का द्यावा लागला राजीनामा ?

Published On: 

अकोला – मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चार मराठी चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. यात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ.भारती पवार,डॉ. भागवत कराड यांचा समावेश आहे. दुसऱ्या टर्ममधील मंत्र्यांची नावे पाहता बहुतांशी खासदार हे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत. भाजपने आयारामांना संधी देताना निष्ठावंतांना डावलले असल्याचे यामध्ये दिसून येत आहे.

भाजपने महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा राजीनामा घेतला असून त्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांचा समावेश आहे. सन २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वऱ्हाडातील अकोला जिल्ह्याला पहिल्यांदाच राज्यमंत्रिपदाचा मान संजय धोत्रे यांच्या रुपाने मिळाला होता. सतत चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले धोत्रे शिक्षण, दूरसंचार व तंत्रज्ञान राज्यमंत्री बनले. पण अवघ्या २६ महिन्यांतच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून ठीक नसल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, धोत्रे यांच्या रुपाने अकोल्याला मिळालेला मान औटघटकेचा ठरला आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या मंत्रिपदाच्या कामगिरीवर मोदी समाधानी नसल्यानेच त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याचं सांगितलं जात आहे. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबतच काही तरुण चेहरे मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे यामुळे देखील संजय धोत्रे यांना जागा रिकामी करावी लागली असावी अशी चर्चा आहे.

दुसऱ्या बाजूला मंत्री प्रकाश जावडेकर यांना देखील काल राजीनामा द्यावा लागला आहे. प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती व प्रसारण, पर्यावरण व अवजड उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला होता. कोणत्याही वादात केंद्र सरकारची बाजू मांडणारे प्रकाश जावडेकर हे केंद्राचे प्रवक्ते होते. मंत्री होण्यापूर्वी जावडेकर यांनी पक्षाचे प्रवक्तेपदही सांभाळले होते.प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.दरम्यान, आता त्यांच्यावर लवकरच पक्षातील मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल अशी चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!