Share

Pak vs ENG | इंग्लंड संघातील खेळाडूंवरील संकट टळले, PBC ने दिली ‘ही’ मोठी माहिती

Published On: 

🕒 1 min read

रावळपिंडी: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pak vs ENG) यांच्यामध्ये आजपासून कसोटी सामना खेळला जाणार आहे. टी-20 विश्वचषकानंतर कसोटी सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहे. इंग्लंडचा तब्बल 17 वर्षातील हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये पोहोताच इंग्लंड संघातील तब्बल 14 खेळाडूंची तब्येत बिघडण्याची माहिती समोर आली होती.

पाकिस्तान दौऱ्यामध्ये इंग्लंड संघातील सदस्यासह संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) देखील या अज्ञात व्हायरसचा शिकार झाला होता. दरम्यान, PBC ने ट्विट करत माहिती दिली की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने बीबीसीला कळवले आहे की, इंग्लंड 11 खेळाडूंना मैदानात उतरवण्याच्या स्थितीत आहे. आज 1 डिसेंबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम येथे सुरू होणार आहे.”

पुढच्या वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून इंग्लंड बाहेर आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. कारण अजूनही जागतिक कसोटी चॅम्पियनच्या अंतिम फेरीत पात्र होण्याची संधी पाकिस्तानला आहे. या यादीमध्ये पाकिस्तान संघ सध्या 51.85 टक्के गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेमध्ये पाकिस्तान संघाने चांगली खेळी खेळल्यास पाकिस्तानला या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळली जाणारी तीन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 भाग आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये रावळपिंडी येथे आज कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना मुलतानमध्ये 9 ते 13 डिसेंबर पर्यंत खेळला जाणार आहे. तर, या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कराचीमध्ये 17 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!