Share

जात लपवून ‘सोवळे’ मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा; पुरोगामी पुण्यातील प्रकार

Published On: 

पुणे:–ब्राह्मण महिला असल्याचे बनाव करून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद व्यक्ति डॉ मेधा खोले अस त्यांच नाव क़सून त्या हवामान विभागाच्या माजी संचालिका आहेत.

प्रकरण नक्की काय आहे?

डॉ. खोले यांच्याघरी दरवर्षी गौरी-गणपती बसतात त्यासाठी त्यांना सोवळ्यामध्ये स्वयंपाक करणारी ब्राह्मण महिला हवी होती. २०१६ मधील मे महिन्यात त्यांच्याकडे एक महिला आली. तिने तिचे नाव निर्मला कुलकर्णी असे सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेच्या घरीही खोले यांनी जाऊन चौकशी केली. तेथेही तिने आपण ब्राह्मण असल्याचे सांगितले. या महिलेने खोले यांच्या घरी २०१६ बरोबरच यंदाही गौरी-गणपती आणि आई- वडिलांच्या श्राद्धाच्या विधीचा सोवळ्यात स्वयंपाक केला. मागील दोन वर्षामधे संबंधित महिलेने सहा वेळा अशा प्रकारे खोले यांच्याकडे स्वयंपाक केला.

खोले यांच्याकडे पूजेसाठी येणाऱ्या गुरुजींनी महिला ब्राह्मण नसल्याचे खोले यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा खोले यांनी महिलेच्या घरी जाऊन सखोल चौकशी केली, त्या वेळी ती ब्राह्मण नसल्याचे समजले. खोले यांच्या घरी सोवळ्यासाठी सुवासिनी ब्राह्मण महिलाच आवश्यक असते. असे असताना तुम्ही खोटे का सांगितले, अशी विचारणा खोले यांनी महिलेकडे केली. त्यामुळे काय होते, असे प्रश्न संबंधित महिलेने विचारले आणि ती त्यांच्या अंगावर धावून आली. तिने धार्मिक भावना दुखावल्या, १५ ते २० हजारांचे नुकसान केल्याचे खोले यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!