🕒 1 min read
मुंबई: देशात कोरोनानंतर रिझर्व्ह बँकेकडून अनेक बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांत अनेक बँकामध्ये नवनवीन प्रणाली बदल्यानात आल्या असून तसेच नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे बँकांच्या कार्यप्रणाली मध्ये देखील बदल होत आहे. यामध्ये 8 सरकारी बँकांमध्ये हे बदल करण्यात येणार आहेत.
त्यामुळे आता ज्या बँक ग्राहकांचे खाते खातं देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया (UBI), सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉरपोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक मध्ये असेल तर 1 एप्रिलनंतर तुम्हाला अडचणी होऊ शकतात.
1 एप्रिल पासून ग्राहकांना जूने चेक, पासबुक आणि इंडियन फायनान्शियल सर्व्हिस कोड (IFSC) इनवॅलिड होणार आहेत. कारण गेल्या दोन वर्षात 8 सरकारी बँकांचे अस्तित्व संपले आहे. या बँकांचे दुसऱ्या सरकारी बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. देना बँक आणि विजया बँक यांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात आलं आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँक ऑफ इंडियाचं (UBI) पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आलं आहे. तर आंध्र बँक आणि कॉरपोरेशन बँक यांचं यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आलं आहे. अलाहबाद बँकेचं इंडियन बँकेत विलीनीकरण करण्यात आलं आहे. यामुळे हे बदल करण्यात आले आहेत.
यामध्ये केवळ सिंडिकेट बँक वगळून अन्य सर्व बँकांचे चेकबुक्स 31 मार्च 2021 नंतर व्यवहारातून रद्द होतील. फक्त सिंडिकेट बँकेचे जूने चेक 30 जून 2021 पर्यंत व्यवहारात राहतील. विलीनीकरण झालेल्या बँकेत ग्राहकांनी उपलब्ध चेकबुक, पासबुकने केवळ 31 मार्चपर्यंतच कामे होतील. 8 बँकांच्या ग्राहकांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी त्वरित शाखेत जाऊन चेकबुक बदलून घ्या. नवे चेकबुक मिळण्यासाठी सात दिवसांचा वेळ लागेल, असेही सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- शरद पवारांनी अनिल देशमुखांना केले सेफ, डॅमेज कंट्रोल म्हणून परमबीर सिंहांची विकेट पडणार ?
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
