पुणे : पुणे महापालिकेच्या नुवडणुका आता जेमतेम एका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. महापालिकेत पदाधिकारी बदलांच्या हालचालींना वेग आला असून, त्याची सुरवात पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी पदाचा राजीनामा देऊन झाला आहे. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या पण भाजपच्या तिकीटावर महापालिकेच्या आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर यांची उपमहपौरपदी निवड होणार आहे. आता उपमहापौरपद पुन्हा एकदा आरपीआयला मिळणार आहे.
सभागृह नेते धीरज घाटे यांनी दोन महिन्यांपूर्वी राजीनामा दिला त्याचवेळी शेंडगे यांचाही राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, शेंडगे यांचा राजीनामा त्या वेळी घेण्यात आला नव्हता. महापालिकेच्या पुढील वर्षी फेब्रवारी महिन्यात निवडणुका होणार असल्याने ‘आरपीआय’ला उपमहापौर पद देण्यात येणार आहे. त्यामुळे शेंडगे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपवरही दबाब होता. अखेरीस शेंडगे यांनी आपला राजीनामा दिला आहे.
महापालिकेच्या विषय समितींच्या सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, महिला व बालकल्याण समिती, विधी समिती या समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांचा विकास आराखड्यामुळे शहर सुधारणा समितीवर नियुक्तीसाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ आहे. या वेळी वेगळ्या चेहऱ्याला संधी देऊन आश्चर्याचा धक्का देण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- शरद पवारांनी अनिल देशमुखांना केले सेफ, डॅमेज कंट्रोल म्हणून परमबीर सिंहांची विकेट पडणार ?
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
