टीम महाराष्ट्र देशा : कळंब (जि. उस्मानाबाद) पंचायत समितीचे सदस्य पळविल्याच्या तथाकथित प्रकरणात तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होत. त्यानंतर आता उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावरही या प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कळंब पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सदस्य माळेवाडी बोरगाव येथे गेलेले होते. त्यात आमदार राणा पाटील यांच्या गटाचेही काही सदस्य होते. हे समजल्यानंतर 29 डिसेंबरच्या रात्री त्या सदस्यांना आणण्यासाठी आमदार पाटील काही कार्यकर्त्यांसह माळेवाडी बोरगाव येथे हिंमतराव पाटील यांच्या बंगल्यावर गेले. तेथे त्यांच्यात वादावादी व झटापट झाली होती. त्यानंतर हिंमतराव पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर 11 जणांवर अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

