Share

दिल्लीसोबतच्या विजयानंतर रोहित शर्माने केलेल्या ‘त्या’ घटनेचं क्रिकेटरसिकांनी केलं भरभरून कौतुक !

Published On: 

🕒 1 min read

युएई : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता चार संघांचं स्थान निश्चित झालं असून ते जोर लावताना दिसत आहेत. कालच्या दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या सामान्यमध्ये मुंबईने दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दिल्लीच्या संघाला अजून एक संधी आहे.

काल, दिल्लीने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. मात्र, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २०० धावांचा डोंगर रचून दिल्ली समोर कडवं आव्हान उभं केलं. यानंतर, दिल्लीच्या फलंदाजांची मुंबईच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली आणि तब्बल 57 धावांनि विजय मिळवत मुंबईने अंतिम सामन्यात धडक मारली.

या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याच्या संघातील खेळाडूला दिलेल्या वर्तणुकीचं कौतुक आता क्रिकेटरसिकांकडून केलं जात आहे. दिल्लीवर विजय मिळवल्यानंतर जेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ ड्रेसिंग रूमकडे जात होता, तेव्हा रोहितने फिरकीपटू राहुल चहरला सर्वात पुढे राहण्यास सांगितले आणि मुंबईचा संघ राहुलच्या मागे जात होता.

रोहितने या युवा फिरकीपटूचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम त्या एका कृतीतून केले. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राहुलला चांगली गोलंदाजी करता आली नाही. त्याने २ ओव्हरमध्ये ३५ धावा दिल्या होत्या. पण तरी देखील कर्णधार म्हणून रोहितने राहुलला पुढे जाण्यास सांगितले आणि टीमचे नेतृत्व करण्यास सांगितले. रोहितच्या या कृतीचं क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावरून भरभरून कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!