Share

काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, मिटकरींचा तुषार भोसलेंवर घणाघात

Published On: 

मुंबई : कोरोना महामारीच्या जागतिक संकटातून बाहेर येताना राज्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र तरी देखील शाळा, मंदिर अजून बंदच आहेत. यात मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन छेडले आहे. भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी यासाठीच तुळजापुरात आंदोलन केलं आहे.त्या आंदोलनावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी भोसलेंवर जोरदार प्रहार केला आहे. काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?, अशी टीकासुद्धा मिटकरींनी भोसलेंवर केली आहे.

जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का?, वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असंसुद्धा अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

स्वतःला तुम्ही संतसाधू म्हणवून घेता, तुम्हाला हरिपाठ तरी पूर्ण पाठ आहे का?, असं थेट आव्हान मिटकरींनी भोसलेंना दिलं आहे. भारतीय जनता पार्टीने काही लोक मुद्दामहून सोडलेली आहेत. ही कुठली आध्यात्मिक आघाडी आहे. तुम्हाला जेवढी काळजी आहे, त्यापेक्षा जास्त काळजी महाविकास आघाडी सरकारला जनतेची आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता सरकारनं हे नियम लावलेले आहेत.

धर्माच्या नावावर वारकरी सांप्रदायाला बदनाम करण्याचं काम हे काही लोक करत आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. मी स्वतः वारकरी आहे. ही मुठभर मोजकी लोक यांनी मुद्दामहून सोडलेली आहेत, जेणेकरून जनतेचं लक्ष विचलित करता येईल. महाविकासआघाडीला बदनाम करण्यासाठी अशी टोकाची भाषा वापरली जात असल्याची टीकासुद्धा अमोल मिटकरींनी भाजपावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!