मुंबई : कोरोना महामारीच्या जागतिक संकटातून बाहेर येताना राज्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र तरी देखील शाळा, मंदिर अजून बंदच आहेत. यात मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन छेडले आहे. भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी यासाठीच तुळजापुरात आंदोलन केलं आहे.
त्या आंदोलनावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी भोसलेंवर जोरदार प्रहार केला आहे. काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?, अशी टीकासुद्धा मिटकरींनी भोसलेंवर केली आहे.
हल्ली काही सोंगाडे स्वतः ला साधु संत समजुन वारकरी धर्माला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करताहेत. वाणीतुन अहंकार, जातीद्वेष क्षणोक्षणी झळकणाऱ्या अशा सोंगाड्यांची वाचा बंद करण्यासाठी तुकोबा सांगतात ,
"अवघे कोलियाचे वर्म अंडी l
घातलिया तोंडी खिळ पडे ll"@TV9Marathi— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 6, 2020
जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का?, वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असंसुद्धा अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
साधूसंत म्हणजे नेमके कोण?, ते आंदोलन करणारे भोसले स्वतःला साधूसंत म्हणवून घेत आहेत. मग साधूसंतांची नक्की व्याख्या कोणती?, असा सवाल अमोल मिटकरींनी केला आहे.
वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
धर्माच्या नावावर वारकरी सांप्रदायाला बदनाम करण्याचं काम हे काही लोक करत आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. मी स्वतः वारकरी आहे. ही मुठभर मोजकी लोक यांनी मुद्दामहून सोडलेली आहेत, जेणेकरून जनतेचं लक्ष विचलित करता येईल. महाविकासआघाडीला बदनाम करण्यासाठी अशी टोकाची भाषा वापरली जात असल्याची टीकासुद्धा अमोल मिटकरींनी भाजपावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- चिल, डोनाल्ड चिल ! म्हणत १६ वर्षीय ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना मतमोजणी थांबवण्यावरून सुनावले…
- आदित्यजी ! …तर पुढील सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देत राहतील – सत्यजित तांबे
- टीआरपी रेटिंग एजन्सीसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन
- खोट्या खेलो इंडिया जाहिरातीद्वारे अनेक खेळाडूंना फसवल्याप्रकरणी एफआयआर दाखल
- राज्यपाल चांगली व्यक्ती ते प्रस्तावाला विरोध करणार नाहीत – भुजबळ

