Share

धक्कादायक : पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित व्यक्तीचा ‘कोरोना’ मृत्यू

Published On: 

मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने जगभरात घातलेले थैमान कायम आहे. कालच्या एका दिवसात आतापर्यंतचे 24 तासातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी गेले आहेत. जगभरात एकाच दिवशी तब्बल 4 हजार 883 जणांना ‘कोरोना’मुळे जीव गमवावा लागला.

अशातच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी काम केलेल्या व्यक्तीचा करोनानं मृत्यू झाला आहे. पंजाबच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. करोना झाल्याचं निदान झाल्यानंतर या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुवर्ण मंदिरात माजी हजुरी रागी आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या ६२ वर्षीचे होते. त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते.

दरम्यान, अस्थमाचा त्रास असल्यानं या व्यक्तीच्या जिवास धोका असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. प्रकृती ढासळल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बुधवारी करोना झाल्याचं निदान झाल्यानंतर गुरूवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!