ठाणे : एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या ड्रायव्हरची लाठ्याकाठ्या व दगडानं ठेचून हत्या केली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला होता. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही करण्यात आली होती. राज्य सरकारनं गुन्हे शाखेकडं प्रकरणाचा तपास सोपवला होता.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले इथल्या साधूंच्या तिहेरी हत्या प्रकरणातल्या 47 आरोपींना ठाणे न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तीन वेगवेगळ्या कलमांअंतर्गत आरोपीं विरूद्ध तीन एफ.आय.आर कासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात सीआयडीनं आता पर्यंत एकुण 229 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी आतापर्यंत 133 जणांना जामीन मिळाला असून यापैकी 68 जण सुटून बाहेर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- देशात 5G सुविधा लवकरच; मुकेश अंबानींची मोठी घोषणा
- ‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- ‘मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत,डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत’

