Share

वैभव पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अकोल्यातील आदिवासी बांधवांनी काढला मोर्चा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपात जाणाऱ्या अकोल्याचे आ. वैभव पिचड यांना पक्षांतरा आधीच धक्का बसला आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आमदार वैभव पिचड यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला असून पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप – सेनेत पळ काढला आहे. त्यात राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असलेले मधुकर पिचड यांचे सुपुत्र वैभव पिचड यांचा देखील समावेश आहे. वैभव पिचड यांनी नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तर लवकरच ते भाजपवासी होणारा आहेत.

असे काही गोड गोड चालू असतनाच वैभव पिचड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी अकोले इथं मोर्चा काढला. पिचड यांच्यावर आदिसवासींनी जमीन बळकावण्याचा आरोप केला आहे. या जनआक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव सहभागी झाले होते. त्यामुळे वैभव पिचड यांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी सत्ताधरी भाजपकडे पळ काढला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व निवडणुकी आधीचं धोक्यात आले आहे. तर नगरमध्येही अशीच काहीशी स्थिती पाहिला मिळत आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक मधुकर पिचड यांचे पुत्र आणि अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड यांनी देखील राष्ट्रवादीला राम-राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातून देखील राष्ट्रवादी पक्ष हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

‘भाजप-आणि शिवसेना आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत’

मी राजीनामा दिलेला नाही, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

#पक्षांतर : ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील नेते भाजपात येत असतील, तर त्याला आम्ही काय करणार’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!