मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा चित्रपट झी फ्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला यु/ए प्रमाणपत्र बहाल केले आहे. या चित्रपटाचा कालावधी ११४ मिनीटाचा असणार आहे. त्यामुळे हा सलमानचा सर्वात कमी कालावधीचा चित्रपट ठरणार आहे.
मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमातील सलमान खानने स्वतः २१ सीनमध्ये दुरुस्त्या केल्या आहेत. यामध्ये एका दृश्यात लहान मुलगा ड्रग्स घेताना दाखवले होते. त्यामुळे यातील सहा दृश्ये काढून टाकण्यात आली आहे. ८ ते १४ वर्षांदरम्यानची मुलेही हा सिनेमा पाहणार असल्याने त्यांना ड्रग्जचे दृश्य दिसू नये म्हणून सलमानने ही दुरुस्ती केली आहे. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या बाहेर येत असलेला अजानचा आवाज देखील काढून टाकण्यात आला आहे. याचबरोबर स्वच्छ भारत समर्थन करताना ‘स्वच्छ मुंबई’ चा उल्लेख बदलून ‘स्वच्छ भारत’ असा उल्लेख केला गेला आहे.
‘राधे’ सिनेमा संपूर्ण देशभर दाखवला जाणार असल्याने सर्व देशाचा संदर्भ जोडण्यात आला आहे. कोणतेही चुकीचे दृश यातून जाऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. ‘राधे’ या चित्रपटात सलमान खान सोबत दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंका दौऱ्यावर नसणार विराट-रोहित
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- ‘संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही, अन् सामना देखील वाचत नाही’
- खरं तर माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीमुळेचं वाचला ; अश्विनने सांगितला भावूक प्रसंग
- एक वेळ अशी येईल तो केवळ ‘मिस्टर ३६०’ म्हणुन सदैव स्मरणात राहिल, सेहवागकडुन एबीची स्तुती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

