नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर इंडिया यांच्यामध्ये सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना किंवा नियमावलीवरून वाद सुरू आहे. तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती, ट्विटरवर कोणताही संदेश टाकणाऱ्या व्यक्तीची माहिती अशा गोष्टींवरून दोन्ही बाजूंकडून वाद घातला जात आहे.
भारताचे नवे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारताच ट्विटरला कठोर शब्दात सुनावलं आहे. ट्विटरला भारतातील आयटी नियमांचं पालन करावंच लागेल अशा शब्दात त्यांनी खडसावलं आहे. ‘देशातील कायदा सर्वोच्च आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल. ट्विटरलाही कायद्याचं पालन करावं लागेल’, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Assumed the charge of Minister of Communications at Sanchar Bhawan today. pic.twitter.com/BPQYyDxNVG
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) July 8, 2021
ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नव्या आयटी कायद्यांवरुन घमासान सुरू आहे. नव्या कायद्यामुळे सोशल मीडिया वेबसाइट्स देखील आता अनुचित प्रकार आणि घटनांसाठी जबाबदार ठरणार आहेत. नव्या नियमांनुसार तक्रार आणि अनुपालन अधिकाऱ्याची नेमणूक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय संबंधित देशाच्या कायदे संस्थेकडून केल्या जाणाऱ्या आदेशांच्या अंमलबजावणीच्या समन्वयाचीही जबाबदारी या अधिकाऱ्यावर असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- ‘कोणी सांगितले मुंडे भगिनी नाराज आहेत? त्यांची उगीच बदनामी करू नका’, फडणवीस संतापले
- ‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले होते’, दरेकरांचा राऊतांना टोला
- मंत्रिपद नाकारल्याने मुंडे भगिनी नाराज? ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर भाजपने दिले स्पष्टीकरण
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी नाही, पण शरद पवारांनी फोन करून शुभेच्छा दिल्या’, मंत्री राणेंची माहिती


