Share

रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरणारे, आज राष्ट्रवादीकडे भीक मागत आहेत- मनसे

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीतील मतभेदांची मालिका काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘आमचे नगरसेवक परत पाठवा, असा संदेश पाठवल्याच्या बातम्या आज विविध माध्यमांनी दिल्या आहेत.

पूर्ण होणार सरोज खान यांची ‘हि’ अंतिम इच्छा?

४ जुलै रोजी अहमदनगर मधील पारनेर नगरपंचायतीच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या घटनेमुळे शिवसेनेला राष्ट्रवादीने खिंडार पाडल्याचे बोलले जात आहे. हा पक्ष प्रवेश खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीला पार पडला होता.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना कळवला असल्याची चर्चा आहे.

नगरसेवक फोडाफोडीच्या घटनेवरुन महाविकास आघाडीत तणाव वाढला असताना आता मनसेने या वादात उडी घेतली आहे. मनसे सरचिटणीस माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन, शिवसेनेवर तोफ डागली आहे.’रात्रीच्या अंधारात नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे आज दिवसा उजेडी राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागत आहेत. कालाय तसमें नमः’, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

न्याय्य हक्कासाठी लढू आणि जिंकू सुद्धा ! – खा. संभाजीराजे

दरम्यान, शिवसेनेने ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबई महापालिकेतील मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवक फोडत मनसेला खिंडार पाडले होते. मनसे नगरसेवकांनी फुटून शिवसेनेत प्रवेश केल्याने महापालिकेत शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ वाढले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!