Share

पूर्ण होणार सरोज खान यांची ‘हि’ अंतिम इच्छा?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं ३ जुलै रोजी पहाटे निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सरोज खान यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. सरोज खान यांची मुलगी सुकैनाने याबाबत एका वेबसाइटला माहिती दिली. कोरिओग्राफ आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा हा सरोज खान यांच्या बायोपिकवर काम करू इच्छित आहे.

रेमो डिसूझाने त्यांचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आणावा अशी सरोज खान यांची इच्छा होती. एका रिपोर्टनुसार, रिमो डिसूझो म्हणाला, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सरोजजी अशा महिला होत्या ज्यांनी संघर्ष आणि कठोर परिश्रम याच्या जोरावर यश मिळवले होते. त्यांच्या संघर्षाची तुलना कोणाशीही करता येणार नाही. सरोज खान यांच्या संघर्षाला बघून मी त्यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याचे ठरवले होते. त्यांनी देखील हसत- हसत यासाठी होकार दिला होता आणि लवकर सिनेमा बनव असे सांगितले होते.

सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं. १९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसंच सरोज खान यांना आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे.

मास्क आणि सॅनिटायझरच्या मनमानी किंमतींवर चाप बसणार, राजेश टोपेंचा मोठा निर्णय

‘ही राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल’

परीक्षांबाबत यूजीसीने घेतलेल्या निर्णयाला युवसेनेचा विरोध, सरदेसाईंनी विचारला ‘हा’ मार्मिक सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!