औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या अतिशय जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे मुख्य जलवाहिन्यांना सुस्थितीत ठेवून शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला चोवीस तास कसरत करावी लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दोन्ही जलयोजनांवरील मुख्य जलवाहिन्यांना गळती लागण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे आता या वाहिन्यांवर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत चोवीस तास वॉच ठेवला जात आहे. यासाठी रात्र आणि दिवस पाळीसाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
वाढत्या कोरोनामुळे यंदाही पाण्याची मागणी वाढली आहेत. त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांचे बोअरवेल कोरडे पडण्यास सुरूवात होते. त्यामुळे गुंठेवारीसह शहरभरातून पाण्याची मागणीही वाढते. मात्र मागणीच्या प्रमाणात सुरळीत पाणीपुरवठा करताना जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान १४०० व १७०० मिलीमीटर व्यासाच्या दोन्ही मुख्य वाहिन्यांवरील एखादी गळती वाढली की सुरळीत पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होऊन शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होतो.
हा प्रकार टाळण्यासाठी गळती मोठी होण्याऐवजी ती लागताच बंद करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत गस्त घालण्यासाठी २४ तास कर्मचारी कामाला लावले आहे. जायकवाडी ते फारोळा आणि फारोळ्यापासून शहरातील नक्षत्रवाडी एमबीआरपर्यंत अशा दोन टप्प्यात रात्र आणि दिवस पाळीत गस्त घालण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कर्मचारी तैनात केले आहे. हे कर्मचारी गस्तीदरम्यान वाहिन्यांना कुठे गळती दिसून आल्यास ती लगेच बंद करत आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर सात दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होईल – तात्याराव लहाने
- तब्बल ४२ महिन्यांनंतर लालूंना जामीन, आजारपणामुळे कोर्टाचा निर्णय
- ‘मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ३ वेळा फोन केला पण ते सध्या बंगालाच्या प्रचारात व्यस्त आहेत’
- विनामास्क फिरणे पडले महागात; ५ हजार जणांकडून ६ लाखांचा दंड वसूल
- हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला – हसन मुश्रीफ

