Share

विभागीय आयुक्ताच्या आदेशानंतर मनपाची पथके रस्त्यावर; ३७६ जणांवर कारवाई

Published On: 

नांदेड : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोना संदर्भात दिलेल्या आदेशानंतर नांदेड महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महापालिका पथक रस्त्यावर उतरुन कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करत आहे. गुरुवारी दिवसभरात मनपा पथकाने ३७६ जणांवर कारवाई केली आहे. मनपाची ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी स्पष्ट केले.

विभागीय आयुक्त यांनी कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने सर्व जिल्हा प्रशासनाला कोरोना नियम कठोर करण्याचे आदेश दिले आहेत. यांनतर नांदेड मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी शहरातील कोचिंग क्लासेस व मंगल कार्यालय चालकांची बैठक घेतली. यावेळी खासगी क्लासेसला सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणे तर, मंगल कार्यालयासाठी परवानगी पेक्षा अधिक लोक आले तर कार्यालय सील करण्यात येईल अशी ताकीद दिली आहे.

इतके करुणही जर कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात नाही आली तर लॉकडाउनचा पर्याय निवडावा लागेल. लॉकडाउन टाळण्यासाठी कोरोना नियमाचे सक्तीने पालन करावे असे आवाहन मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने यांनी केले आहे. गुरुवारी मनपा पथकाने रस्त्यावर उतरुन एकूण ३७६ जणांविरुद्ध कारवाई करत ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!