मुंबई : सर्वत्र आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात. राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे.
सरकारने गर्दी न करण्याचे फर्मान शिवप्रेमींसमोर ठेवले आहे. त्यातच अनेक शिवप्रेमींनी शिव जन्मोत्सव आपल्या घरातच साजरा केला आहे. दरवर्षी प्रमाणे शिव जयंती उत्साहात साजरी होत आहे. यंदा मात्र सार्वजनिक कार्यक्रमावर सरकारने निर्बंध आणले आहे. त्यामुळे शिव प्रेमी जयंती घरीच साजरी करण्यावर भर देत आहे.
शिव जयंतीनिमित्त भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने ट्विटर वर एक पोस्ट करून नमन केलं आहे. वीरेंद्र सेहवाग ने ट्विट मध्ये लिहिले, “इतिहास आपल्याला सांगतो की शक्तिशाली लोक शक्तिशाली ठिकाणाहून येतात. इतिहास चुकीचा होता! शक्तिशाली लोक ठिकाणे शक्तिशाली बनवतात’ जय मां भवानी.’
“History tells us that powerful people come from powerful places. History was wrong! Powerful people make places powerful"
Tributes to the great Chhatrapati #ShivajiMaharaj on his Jayanti.
Jai Maa Bhavani pic.twitter.com/frRS8hroEc— Virender Sehwag (@virendersehwag) February 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- खंडपीठाची दिशाभूल; नगर परिषदेच्या सीओसह 4 अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक लाखांचा दंड
- ‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार
- अर्जुन तेंडुलकरच्या निवडीनंतर बहीण साराची प्रतिक्रिया
- लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीच्या पाठीवर चाकूने वार; दीड लाख रुपयांची रक्कम लंपास
- ज्या खेळाडूसाठी विराटची 28 कोटी मोजण्याची होती मात्र…


