Share

रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोवर ते खोदू नका-आ.नमिता मुंदडा

Published On: 

बीड : अंबाजोगाईत शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची बैठक पार पडली. आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्याच्या रखडलेल्या कामाने आणि वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींनी अंबाजोगाई व परिसरात अपघातांचे सत्र वाढले आहे. हे वाढते अपघात रोखण्यासाठी रखडलेले रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा. रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोवर रस्ते खोदू नका अशा सूचना आ. नमिता मुंदडा यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

बैठकीला नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, एच.पी.एम. कंपनीचे संचालक अजय देशमुख, तांत्रिक सल्लागार रविकुमार, अभियंता निवृत्ती शिंदे, विकास देवळे यांची उपस्थिती होती. बैठकीत आ.मुंदडा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे विविध समस्यांवर लक्ष वेधले. पिंपळा ते मांजरसुंबा या ८२ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत मंद गतीने सुरू असलेल्या या कामामुळे रहदारीस मोठ्या अडथळे निर्माण होत आहेत. काम सुरू करण्याअगोदरच रस्त्यांवर खड्डे खोदून ठेवण्यात येत असल्याने याचा मोठा त्रास वाहनचालकांना होतो. रखडलेल्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशा सूचना त्यांनी केल्या.

मुदतीपूर्वी काम पूर्ण करा. अशा सूचना देऊन जिथे पुलाचे काम सुरू आहे. तिथे डांबरी रस्त्याचे डायर्व्हशन करा. भाटुंबा व कळमअंबा येते चार नळ्यांचे पूल बांधण्यात यावेत. नेकनूर व केज शहरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. अंबाजोगाई शहरात लोखंडी सावरगाव ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत रस्ते खोदू नका. अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!