औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील कोरडगाव शिवारातील एका शेतातुन एका रात्रीत तब्बल ३५० चंदनाची झाडे चोरीला गेल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेनंतर तालुक्यात पुन्हा चंदनचोरांची टोळी सक्रिय झाल्याने खळबळ माजली आहे. या चोरीत शेतमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
निमगोंदगाव वैजापुर येथील आदिनाथ सखाहरी मदने हे औरंगाबादला नोकरीनिमित्त राहतात. कोरडगाव शिवारात त्यांची तीन एकर शेती आहे. यातील एक एकरमध्ये मदने यांनी ५ वर्षापुर्वी ४०० चंदनाची झाडे लावली होती. मागील ५ वर्षात योग्य देखभाल केल्याने झाडांची वाढ चांगली झाली होती. मात्र गुरुवारी सकाळी बटाईदार हरिभाऊ त्रिभुवन शेतात गेले आसता त्यांना चंदनाची झाडे चोरीला गेले असल्याचे लक्षात आले, त्यांनी तत्काळ आदिनाथ मदने यांना चोरीची माहिती दिली.
या घटनेने मदने यांचे जवळपास ८० लाखांचे नुकसान झाले आहे. मदने यांनी तत्काळ शिवूर पोलिस ठाण्यात चोरीविषयी माहिती दिली. मात्र, वन विभागाचा पंचनामा झाल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल असे शिवूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरख शेळके यांनी सांगितले
महत्वाच्या बातम्या
- ‘स्मार्ट’ खेचाखेची, सीईओपदी राहणार कोण? पांडेय की मनोहरे
- ज्या खेळाडूसाठी विराटची 28 कोटी मोजण्याची होती मात्र…
- साष्ट पिंपळगावातील आंदोलक आक्रमक; आता ७ मार्चला राज्यभरात आक्रोश मेळावा
- कोरोनाचा धोका वाढल्याने श्रीतुळजाभवानी मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
- आपण स्मार्ट सिटीच्या सीईओपदी रुजु होत आहोत; स्थगितीनंतरही मनोहरे यांचे पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

